India Post service: पोष्टमनकाका आता टपाल घेण्यासाठी घरापर्यंत येणार
आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रे आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्याच्याकडून स्वीकारले जाणार आहेत. ही नवी सोयी सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू झाली आहे. नंतर ती आता हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरात सुरू होईल.
एखादी वस्तू 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे असेल तर टपालवाहक (पोस्टमन) फक्त 50 रुपये सेवा शुल्क आकारणार आहे. त्यापेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी शुल्कच आकारले जाणार नाही. पोष्ट विभागाच्या या नव्या धोरणात्मक निर्णयामुळे पोष्ट विभागाकडून खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा होेणार आहे. पोष्ट विभाग नवनवीन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना दिसत आहे. अॅडव्हान्स्ड पोस्टल तंत्राचे नवे प्रोग्राम (सॉफ्टवेअर) प्रणाली सुरू केली आहे. नागरिकांना सेवा देता येईल. घरून नोंदणी झालेले आर्टिकल पोष्टमन घेऊन जाईल.
नव्या सुविधेमुळे कुरिअरला स्पर्धा
नव्या सेवेची सुविधा ही रविवारसह अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशी ती उपलब्ध असणार नाही. नागरिकांसाठी सुरू केलेल्या या नव्या सुविधेचा डाक विभाग अन्य खासगी कुरिअर कंपन्यांना थेट टक्कर देणार आहे.
दिल्लीसह मोठ्या शहरात उपलब्ध
दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही शहरे, जोधपूर (राजस्थान), हैदराबादसह प्रतापगड, (उत्तर प्रदेश) यासह अन्य काही शहरांमध्ये सुरू झाली असून लवकरच अन्य मोठ्या शहरात ती सुरू केली जाणार आहे.
संकेतस्थळावर जाऊन नोेंदणी
नागरिकांंना पोष्ट विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावे लागणार असून. मुख्य पृष्ठाभागावर ’ऑनलाइन सर्व्हिस’ निवडावे लागेल वैशिष्ट्यकृत ’फीचर्ड’ व यानंतर ’सेल्फ सर्व्हिस पोर्टल’ वर जावे लागेल.
घरात बसून नोेंदणी होईल
पोर्टलवर नोंदणी झाल्यावर नागरिकांचा ग्राहक आयडीसह लॉगिन पासवर्ड तयार होतो. यावरून घरात बसून नोंदणी करता येते.

