

सोलापूर : मरणोत्तर सुद्धा माणसाला हातासह आपले अकरा अवयवांचे दान करून दुसऱ्यांना जीवनदान देता येते. सध्या, अनेक वयोगटातील माणसांची किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच, किडनी मागणीचे प्रमाण वाढतांना दिसतात. मात्र, याविषयी समाजात आजही अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर होणे महत्त्वाचे आहे. तरच अवयवदान वाढेल.
अवयवदानाविषयीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी ही गरज बनली आहे. शहर-जिल्ह्यातील अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवनाची आशा मिळते. मात्र, याविषयी समाजात आजही अनेक गैरसमज आणि भीती आहेत. ते दूर करून जनजागृती वाढविण्याची गरज आहे. दोन किडनी, फुफ्फुस, हृदय, लिव्हर, लहान व मोठे आतडे, स्वादुपिंड, डोळे, त्वचा आणि हाताचे दान करता येते.
सध्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. हृदय, यकृत, फुफ्फुस यांसारख्या अवयवांचीही गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेच. मृत्यूनंतर शरीराचे काय होते. धार्मिक भावना, अवयवदानाची प्रक्रिया व त्यासाठीची परवानगी याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक जण अवयवदानाचा निर्णय घेत नाहीत.
अवयवदान ही केवळ वैयक्तिक बाब न राहता सामाजिक चळवळ बनली पाहिजे. मरणोत्तर अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते.