Solapur Missing minors: बेपत्ता दोन अल्पवयीन मुलांचा पोलिसांकडून 24 तासांत शोध

ऊसतोड मजुरांची बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले पोलिसांनी चोवीस तासाच्या आत शोधली व आई-वडिलांकडे सुपूर्द केली
Solapur Missing minors
Solapur Missing minorsPudhari
Published on
Updated on

कुर्डूवाडी : ऊसतोड मजुरांची बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले पोलिसांनी चोवीस तासाच्या आत शोधली व आई-वडिलांकडे सुपूर्द केली. राजेंद्र सुरजित भिल (रा. हिसाळे, ता. श्रीपूर, जि. धुळे, सध्या रा. भोसरे) हे ऊसतोड मजूर आहेत.

कामामुळे ते पत्नी व तेरा वर्षांचा अर्जुन व आठ वर्षांचा विकी या दोन मुलांसह भोसरे येथे तात्पुरत्या कोपीत राहतात. येथून दोन्ही मुले बेपत्ता झाली होती. पोलिसांनी ती शोधून काढली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा. अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अतुल मोहिते, सारिका गटकुळ, पोहेकॉ शशिकांत डोळे, श्रीमंत खराडे यांनी केली.

अशी आढळली मुले

पोलिसांचे दोन शोध पथक होते. रेल्वे स्टेशन, कुर्डूवाडी व आजुबाजुच्या परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच समक्ष चौकशी केली. ही मुले कुर्डूवाडीत सुखरूपपणे मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news