PM-Kisan e-KYC : पीएम किसान ई-केवायसीसाठी ३० जूनपर्यंतची डेडलाईन

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक , अन्यथा वार्षिकरित्या मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार
PM KISAN
PM KISAN File Photo
Published on
Updated on

सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा वार्षिकरित्या मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.

खरीप हंगामानिमित्ताने कृषी विभागाकडून गावोगाची मेळावे, घेण्यात येत आहेत. त्यात जनजागृती सुरू आहे. पीएम किसानचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थ्याच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news