

सोलापूर : अक्षय सोसायटी जुळे सोलापूर येथे दुय्यम निबंधक वर्ग दोन येथे असलेल्या 435 स्क्वेअर फूट जागेच्या खरेदीत 18 लाखांपैकी उर्वरित तीन लाख 45 हजार रुपये मूळ मालकाला न देता फसवणूक केल्याची घटना घडली.
याप्रकरणी अनिल हरिश्चंद्र उपरे (रा. अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अजयराज आत्माराम सावंत (रा. अक्षय सोसायटी, जुळे सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यात अधिक माहिती अशी की, अनिल उपरे यांच्या मालकीचे मौजे मजरेवाडी येथील गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ क्षेत्र सोलापूर येथील म्हाडा मंडळ भूखंड जागा जुना सर्व्हे नंबर 328/1 बी, व नवीन सर्व्हे नंबर 115/1 बी, ही मिळकत आहे. यात 435 स्क्वेअर फूट जागा आहे. सदरची मिळकत अजयराज सावंत यांनी 24 लाख 20 हजार रुपयांत खरेदी केली. हा व्यवहार तीन टप्प्यांत करण्यात आला. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात दोन लाख 25 हजार रुपये आरटीजीएसद्वारे व उर्वरित रकमेपोटी धनादेश देण्यात आला. त्यापैकी केवळ आतापर्यंत अठरा लाख 85 हजार रुपये उपरे यांना मिळाले. परंतु, उर्वरित तीन लाख 45 हजार रुपये खरेदीस दिलेले नाही अथवा रकमेपोटी दिलेला धनादेशही वटला नाही. याबाबत उपरे यांनी पाठपुरावा करून रक्कम मिळाली नाही.