Solapur hospital incident: अर्भकाला सोडून आई-वडील पसार

सोलापूर शासकीय रुग्णालयातील घटना
Solapur hospital incident: अर्भकाला सोडून आई-वडील पसार
File Photo
Published on
Updated on

सोलापूर : नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून आई-वडील पसार झाल्याची घटना सोलापुरात घडली. याबाबत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आई-वडिलांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्गा नागेश राऊळे या गर्भवती असताना पती नागेश राऊळे (दोघे रा. बिदर, कर्नाटक) याच्या सोबत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी 17 फेब्रुवारी रोजी दाखल झाल्या. त्यांची प्रसूती होऊन स्त्री जातीचे अर्भक जन्माला आले. अर्भकाची प्रकृती ठीक नसल्याने त्याला

एन.आय.सी.यु. मध्ये दाखल केले. 21 फेब्रुवारीपर्यंत दोघेही अर्भकाजवळ थांबत होते. परंतु त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुर्गा राऊळे आणि नागेश राऊळे अचानक गायब झाले. त्यांनी रुग्णालयात दाखल होताना आधारकार्ड व संपर्क नंबरही दिला नाही. बाळाला तसेच सोडून ते पळून गेल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनी त्या अर्भकाची काळजी घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान 11 मार्चपर्यंत वाट पाहूनही दोघे अर्भकाला घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील स्त्री व प्रसुती शास्त्र विभागातील डॉ. स्वाती हनुमंत भोसले यानी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुर्गा राऊळे व नागेश राऊळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news