Kumbh Mela logo: पंढरीतील युवकाने साकारले कुंभमेळ्याचे बोधचिन्ह

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पियुष पिंपळनेरकरला एक लाखाचे पारितोषिक प्रदान
Kumbh Mela logo: पंढरीतील युवकाने साकारले कुंभमेळ्याचे बोधचिन्ह
Published on
Updated on

पंढरपूर : नाशिक येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने बोधचिन्ह (लोगो) साकारण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील पियूष पिंपळनेरकर या तरुणाने साकारलेल्या बोधचिन्हाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

राज्य शासनातर्फे एक लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये गौरविले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन आदी मंत्री उपस्थित होते. तीन हजार स्पर्धकांमधून पियुष पिंपळनेरकर यांने हे सुयश मिळविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news