Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मंदिरात संत-देव भेटीचा सोहळा

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या.
Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मंदिरात संत-देव भेटीचा सोहळा
Published on
Updated on

पंढरपूर : गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या. सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. यावेळी देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली.

श्री विठ्ठल- रुक्म‍िणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला. देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. यानंतर जड अंत:करणाने संताच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला.

आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीमाता अहोरात्र उभे असतात. या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात. श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो. त्यामुळे सोमवारी (दि.३ ऑगस्ट) श्रींची प्रक्षाळपूजा करण्यात येणार आहे, तर गुरुवार दि.३० जुलै रोजी महाद्वार काला होणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news