Pandharpur Vitthal Temple | श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील कामाचे होणार ऑडिट

गळतीबाबत पुरातत्त्व विभागास आवश्यक सूचना; जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव सादर
Pandharpur Vitthal Temple |
Pandharpur Vitthal Temple | श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील कामाचे होणार ऑडिटFile Photo
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन तसेच जीर्णोद्धाराची कामे शासन निधीतून पुरातत्त्व विभागामार्फत दि.16 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली आहेत. या कामाचे पर्यवेक्षण करून गुणवत्तापूर्ण कामे पुरातत्त्व विभागामार्फत करून घेण्यात येत आहेत.

मात्र, दि. 22 व 26 जुलै रोजी मंदिरात मुसळधार पावसाने गळती होत असल्याचे दिसून आले. याबाबत पुरातत्त्व विभागास याबाबत पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. या जतन व संवर्धन कामासंदर्भात मंदिर समितीच्या वेळोवेळी झालेल्या सभेमध्ये आढावा घेण्यात येत आहे. कामाबाबतच्या तशा सूचना पुरातत्त्व विभाग व कंत्राटदार यांना देण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने वॉटरप्रूफिंगची कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत. असे पुरातत्त्व विभागाने कळवले आहे. परंतु, गळती होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात आलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news