Pandharpur Vitthal Rukmini Temple: विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची उद्यापासून नोंदणी

भाविकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा
Pandharpur Vitthal Rukmini Temple: विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची उद्यापासून नोंदणी
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजनेच्या पुजा उपलब्ध करुन देण्यात येतात. मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन पूजेची नोंदणी करता येणार आहे. ३ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

मंदिर समितीकडून श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि देशातील विविध राज्यांतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत नोंदणीसाठी मदत व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भाविकांनी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी व्यवस्थापक घम यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news