Pandharpur Vitthal Rukmini Temple: रक्षाबंधन सणानिमित्त विठ्ठलास सोन्याची राखी

रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान; मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini TemplePudhari
Published on
Updated on

पंढरपूर : राखी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले तर विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्यात आली. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले. हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

रक्षाबंधनानिमित्त विठ्ठलास सोन्याचा नक्षी टोप प्रभावळ असलेला, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठे, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्‍याची कंठी दोन पदरी, मारवाडी पेट्यांचा मोत्याचा हार, मत्स्य जोड, सोने पितांबर, तुळशीची माळ एक पदरी, सोन्याची राखी, बाजीराव कंठी आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या तोडे, तोडे जोड, तारवड जोड, जवमणी पदक, चिंचपेटी तांबडी, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते.

जलद व सुलभ दर्शन व्यवस्था

रक्षाबंधन सणानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत. सणानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली असल्याने मंदिर समितीकडून सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. यातच शनिवार व रविवार विकेंड असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन जलद व सुलभ दर्शन व्यवस्था निर्माण करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news