Pandharpur News: तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा

पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भगीरथ भालके यांना धोबीपछाड
Pandharpur News: तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा
Published on
Updated on

पंढरपूर : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भगीरथ भालके यांना धोबीपछाड दिला आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली १२ पैकी ९ नगरसेवकांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे सोलापूर विधानपरिषद निवडणुक रंगतदार वळणावर आल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी आ. समाधान आवताडे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत, मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रशांत गीड्डे, संतोष सुळे, श्याम गोगाव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालकें यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आव्हान दिले होते. तसेच १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉ. प्रणिताताई भालके यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

यावेळी आयोजित मेळाव्यात भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. बुधवारी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीची बैठक भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. या बैठकीला मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते भगीरथ भालके गैरहजर होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषद निवडणुकीबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, अनिल सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

या बैठकीस नगरसेवक नागेश काका भोसले, नगरसेवक प्रसाद भैय्या कळसे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेविका माधुरीताई धोत्रे, नगरसेविका रुक्मिणीताई धोत्रे, नगरसेविका साधना ताई धोत्रे, नगरसेविका प्रणिता ताई घाडगे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनी देखील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे. तसेच वाखरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य मयुरी बागल यांनी देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी संतोष बागल उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news