Pandharpur News : पंढरपुरातील सात रस्ते दिवाळीपूर्वी विद्युत रोषणाईने उजळणार!

रोडलाईट बसविण्यासाठी दोन कोटींचा खर्च; मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा पुढाकार
Pandharpur News : पंढरपुरातील सात रस्ते दिवाळीपूर्वी विद्युत रोषणाईने उजळणार!
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : पंढरपूर शहरातील सात प्रमुख रस्त्यांचे नगरोत्थान योजने अंतर्गत सिमेंट कॉक्रीटीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले आहे. परंतू, या रस्त्यांवर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पुढाकार घेतला आहे. या सात रस्त्यांवर पथदिवे बसविण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी हे रस्ते विद्युत रोषणाईने उजळणार आहेत.

राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत पंढरपूर शहराच्या विकासासाठी सुमारे १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ५२ कोटी रुपये खर्चुन शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करण्यात आली. यामध्ये विविध रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, रस्ते चांगले झाले असले, तरी पुरेशा प्रकाशव्यवस्थे अभावी रात्रीच्या वेळी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

पद्मावती उद्यान ते टाकळी चौक, प्रभात रोड ते पंचरत्न बंगला, तालुका पोलीस स्टेशन परिसर तसेच डीव्हीपी मार्केट आणि पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यांसह शहरातील सात प्रमुख रस्त्यांवर पथदिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होणार

सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झाल्यानंतर आता त्यावर पथदिवे बसविण्यात येणार असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनचालकांना सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. शहराच्च्या सौंदर्यातही भर पडणार आहे. दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण झाल्यास ऐन दिवाळीत हे रस्ते उजाळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.