

पंढरपूर : जिल्हा प्राथमिक शाळा गाजरेवस्ती(शेळवे) येथे कोणताही लाकूडफाटा व गोवऱ्या न जाळता सलग 33 व्या वर्षी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षक वाघमारे यांनी पुढकार घेतला.
ग्राम स्वच्छतेद्वारा विद्यार्थी शिक्षक व पालकांनी केरकचरा एकत्रित गोळा केला. होळीचे विधीवत पूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष बागल व सरपंच अनिल गाजरे यांनी केले. विद्यार्थिनी सानिका गाजरे, आलिशा शेख, आरोही गाजरे, श्रवण गाजरे यांनी होळी व पर्यावरणबाबत माहिती दिली. शिक्षिका जस्मिन मुलांनी यांनी आभार मानले. यावेळी संभाजी गाजरे, अरुण गाजरे, नारायण गाजरे, हरिदास गाजरे, सद्दाम शेख, विजया गाजरे, सोमा सुर्वे, सदाशिव गाजरे, बाळासाहेब गाजरे व विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.