Pandharpur News : पंढरपुरात 105 वाहनांवर कारवाई

57 हजारांचा दंड वसूल, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दणका
Pandharpur News
Pandharpur News
Published on
Updated on

पंढरपूर :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलीसांनी रविवार दि.1 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबवली. यामध्ये 105 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन 57 हजार 900 रुपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली.

पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच शहरात मोठी बाजारपेठ, दवाखाने, शासकीय कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातील हजारो नागरिक दुचाकी, चारचाकी अथवा इतर वाहनांने येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ट्रिपल प्रवास, फॅन्सी नंबर, विना परवाना, विना नंबर, कर्कश आवाजाचे सायलन्सर बसविणे तसेच विरुध्द दिशेन गाडी चालविणे. यामुळे सतत वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याला आळा घालण्यासाठी शहर पोलीसांनी विशेष मोहिम राबवून 105 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईची नागरिकांमधून तसेच भाविकांमधून स्वागत केले जात आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, शहर पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, वाहतुक शाखेचे ठाणे अंमलदार, होमगार्ड यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news