

पंढरपूर : आषाढी यात्रेत आलेल्या दिंडीतील ट्रॅक्टर, तसेच शेतीला पाणी पुरवठा करणार्या पाच विद्युत मोटारी आणि एक दुचाकी असा चोरीला गेलेला एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दि. रोजी 30 जून रुपेश अजितराव देवकाते रा. गुरसाळे यांच्या दोन पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्याबाबत पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपास पंढरपूर तालुका पोलिसांनी केला. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटारीची किंमत रुपये 2 लाख 15 हजार व एक मोटारसायकल असा एकूण 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस 2 जुलै रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखीमधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता. त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर चळे, ता. पंढरपूर गावातून जप्त केला आहे. या ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणार्या मोटारी एकूण पाच मोटारी तसेच एक मोटारसायकल असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, सहाय्यक फौजदार शेंडगे, पोलिस हवालदार घंटे, गजानन माळी, सागर गवळी यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.