

पंढरपूर : नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू धंद्याविरुद्ध धडक मोहीम एकूण 25 हजार पाचशे रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांनी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील खर्डी, कासेगाव, देगाव, रांजणी, पुळुज या ठिकाणी अवैध दारू विरुद्ध कारवाई केली. यात एकूण देशी विदेशी कंपनीची 25 हजार 500 रुपयाची अवैध दारू पोलिसांनी जप्त केलेली आहे. तर एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सपोनी विश्वास पाटील, पीएसआय भारत भोसले, पीएसआय विक्रम वडणे, पो. अं. संजय गुटाळ, पा. हे. स्वप्निल वाडदेकर, परशुराम शिंदे, मंगेश रोकडे, दत्तात्रय तोंडले, तात्या गायकवाड, सुनील कवडे यांच्या पथकाने केली आहे.