

पंढरपूर : पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पंढरपूर शहर पोलिसांनी इसाबावी येथील अवैध वाळू साठ्यावर कारवाई करून 52 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इसबाबी परिसरातील 52 एकर परिसराकडे जाणारे सिमेंट रोडच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात भीमा नदी पात्रातून अवैधरित्या बाळू उत्खनन करुन वाळुचा साठा केला होता. जेसीबीच्या सहाय्याने टिपरमध्ये बाळू भरत होते. पोलीस आल्याचे समजताच जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर बगळता इतर 2 दोघेजण रेकी करणाऱ्या लाल रंगाच्या चारचाकी स्विफ्ट कारमधून पळून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता वाहन न थांबवता पळून गेले. त्याचवेळी इतर पोलिसांनी जेसीबी व टिपर ड्रायव्हरला पकडले. पोलिसांनी पाठलाग करून लाल रंगाची स्विफ्ट कार पकडली.
त्यातील चालक तर दुसऱ्या इसमास जागीच पकडले. यावेळी पोलिसांनी सिध्दनाथ भागवत इंगोले (रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यास पकडले आहे. लाल रंगाची स्विफ्ट कार व टिपरचा मालक महेश तानाजी शिंदे (रा. इसबावी) असल्याचे इंगोलेने सांगितले. हनुमंत धनाजी जाधव (रा. वाखरी, ता. पंढरपूर), परमेश्वर महादेव माने(रा. बोहाळी, ता. पंढरपूर) जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर यांना पकडण्यात आले आहे. या कारवाईत जेसीबी, हायवा, 4 ब्रास वाळू, स्विफ्ट कार, मोबाईल असा 52 लाख, 34 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास पोसई श्रीकांत घुगरकर हे करीत आहे.