

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दि. १ ते ९ जुलै या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात आज दि. ३० जून रोजी सकाळी ११ वा. पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या पूजेसाठी २१०० रुपये देणगी मूल्य आहे. दि. १ ते ९ जुलै या कालावधीतील गर्दीचे व सण-उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूजेची नोंदणी या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.