Pandharpur news: तब्बल 7 वर्षांनंतर नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन सुरू

‌‘स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर‌’ संकल्पना प्रत्यक्षात; शहरातील रस्ते होणार चकाचक
Pandharpur news: तब्बल 7 वर्षांनंतर नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन सुरू
Published on
Updated on

पंढरपूर : शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या जाहिरनाम्यातील अत्यंत महत्त्वाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली नगरपरिषदेची ‌‘रोड स्विपर मशीन‌’ (रस्ते साफ करणारे आधुनिक यंत्र) अखेर दुरुस्त करण्यात आली असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजा करून ही मशीन पुन्हा एकदा पंढरपूरकरांच्या सेवेत दाखल करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या त्रासाची दखल घेऊन शहर अधिक स्वच्छ आणि धुळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही आधुनिक यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

यावेळी नगरसेवक सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, प्रसाद भैय्या कळसे, अक्षय गंगेकर, लोकेश यादव, विनायक देवमारे, सुधीर भोसले, भीमराव आप्पा माळी, मुहम्मद उस्ताद, मनमोहन अभंगराव, बापू चौधरी, बंडू डोईफोडे, विशाल आर्वे यांच्यासह नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news