Pandharpur municipal council budget: पंढरपूर नगरपरिषदेचा साडेतीन लाखाचा शिलकी अर्थसंकल्प सादर

शहराच्या सर्वांगीण विकासावर भर; घरकुल योजनांसाठी भरीव निधीची तरतूद
Pandharpur municipal council budget
Pandharpur municipal council budget: पंढरपूर नगरपरिषदेचा साडेतीन लाखाचा शिलकी अर्थसंकल्प सादर Pudhari
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालून वर्षाअखेरीस सुमारे 3 लाख 56 हजार 491 रुपये शिल्लक सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामांसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विठ्ठल मंदिर परिसरात सुचवण्यात आलेला 10 कोटी रुपयांचा वाणिज्य संकुल आराखड्यास एकमताने विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पंढरपूर कॉरिडॉरला न.प.च्या अर्थसंकल्पात विरोध करण्यात आल्याचे दिसत आहे.

पंढरपूर नगरपालिकेचा सन 2026 - 27 सालचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखालील सभेत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यानंतर अंदाजपत्रकातील प्रत्येक तरतुदींवर सुमारे दोन तास चर्चा करण्यात आली. नव्याने सभागृहात आलेल्या सदस्यांनी सूचना केल्या आणि अंदाजपत्रकीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात आरंभीच्या शिलकेसह 2026-27 या वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न 273 कोटी 47 लाख 84 हजार 744 रुपये अपेक्षित आहे. त्या तुलनेत वार्षिक खर्च 273 कोटी 44 लाख 28 हजार 246 रुपये इतका प्रस्तावित आहे. या अंदाजपत्रकात शासकीय कर्जाची परतफेड आणि व्याजाच्या हप्त्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (1 व 2) अंतर्गत गरजूंच्या घरांसाठी तरतूद.

स्वच्छता व आरोग्य : स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि अग्निशमन सुरक्षा अभियानावर भर. रस्ते विकास, पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना (गटार बांधणी), नामसंकीर्तन सभागृह आणि नाट्यगृहांचे बांधकाम. उद्यानांचा विकास, पुतळ्यांची सुधारणा आणि शहराचे सुशोभीकरण. स्मशानभूमी सुधारणा आणि आवश्यक नवीन वाहनांची खरेदी आदीबाबत तरतूद. करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news