Pandharpur Accident Case | पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; चार भाविक ठार, सहा गंभीर

Pandharpur Accident Case | या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Accident News
Accident News
Published on
Updated on
Summary
  1. पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर कंटेनर व क्रुझरची समोरासमोर धडक

  2. अपघातात चार भाविकांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

  3. मृतांमध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश

  4. सर्व भाविक डोंबिवलीतील रहिवासी, ठाण्यातील खाजगी कंपनीतील कर्मचारी

  5. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, पोलीस तपास सुरू

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर आज सकाळी शरदनगर परिसरात भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Accident News
Solapur News : झेडपीच्या बंडखोरांना स्वीकृतचे आमिष

तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत येत असताना भाविकांच्या क्रुझर वाहनाचा हा अपघात झाला. मृत व जखमी झालेले सर्व भाविक ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबीयांसह धार्मिक पर्यटनासाठी आले होते. अपघातातील सर्व भाविक हे डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Accident News
Republic Day : बार्शीच्या कलाकारांच्या शहनाईची गुंज घुमणार दिल्लीच्या विजयपथावर

विशेष म्हणजे हे भाविक आज रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेने रवाना होणार होते. मात्र त्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडल्याने आनंदाच्या प्रवासावर काळाचा घाला बसला.

अपघातानंतर काही काळ पंढरपूर–मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news