Samadhan Awatade | पंढरपूर-मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी : आ. समाधान आवताडे

ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या सूचना
Samadhan Awatade |
मुंबई येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्याशी बैठकीत चर्चा करताना आ. समाधान आवताडे व मान्यवर.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : भारताची दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूरमध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम प्राधान्य देत आ. समाधान आवताडे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत मुंबईत आढावा बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ऊर्जा राज्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांच्या कार्यवाहीबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. मतदारसंघातील महावितरण व महापारेषण विभागाकडील मंजूर तसेच प्रलंबित कामांबाबत हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली.

पंढरपूर शहराचा वाढता आलेख लक्षात घेता काही नवीन कामे उभा करणे गरजेचे आहे. तसेच शहरात वर्षाकाठी भरणार्‍या चार यात्रांमध्ये भाविकांना महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशाबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या शेतकर्‍यांना सोलर पाहिजे आहे, त्यांना सोलरवर कनेक्शन व ज्यांना विजेचे कनेक्शन पाहिजे आहे, त्यांना विजेचे कनेक्शन दिले जावे. मतदारसंघामध्ये ओव्हरलोड असलेल्या सबस्टेशनमध्ये अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसवण्यात यावेत. मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री सोलर योजनेची कामे चालू आहेत व आरडीएसएस या कामांना गती देण्यात यावी. शासनाच्या निरंतर योजनेतून जे ओव्हरलोड 63 चे ट्रान्सफार्मर आहेत. त्याठिकाणी शंभरचे ट्रान्सफार्मर बसवण्यात यावे. यासाठी लागणार्‍या निधीचीही मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व विषयावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित विभागातील अधिकारी यांना दिल्या आहेत.

मंगळवेढा शहर व तालुक्यासाठी

येड्राव आणि कचरेवाडी येथे 33/11 सबस्टेशन, मंगळवेढा शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसर्‍या ठिकाणाहून वीजपुरवठा करण्याची सोय नाही. त्यामुळे त्यासाठी दुसरी नवीन वाहिनी टाकण्यात यावी. मंगळवेढा तालुक्यात विभागीय कार्यालय उभारण्यात यावे. लक्ष्मी दहिवडी, मंगळवेढा शहर, मारोळी, गोपाळपूर, विठ्ठल मंदिर येथे सब स्टेशनचे काम तत्काळ सुरू करावे. निंबोणी येथे 132 केव्हीचे सब स्टेशन उभा केले आहे. त्यावर लोड नसून दक्षिण भागातील सब स्टेशनचा लोड त्यावर टाकण्यात यावा.

पंढरपूर शहरासाठी

चंद्रभागा नदीपात्रामध्ये असलेली 11 केव्ही उच्च दाबाची लाईन घाटाच्या बाजूने अंडरग्राउंड टाकण्यात यावी. गोपाळपूर येथील दर्शनरांग शेजारील पत्राशेड येथे 33 केव्ही सब स्टेशन, वाखरी पालखी तळ 33 केव्ही सबस्टेशन, सांगोला रोडवरील महावितरण येथे बाजूला 33/11 सब स्टेशन, 65 एकरमध्ये 33/11 सब स्टेशन, पंढरपूर परिसरामध्ये 400 केव्हीचे सब स्टेशन उभारण्यात यावे. महापारेषणचे सोलापूर येथे सर्कल ऑफिस असून त्याचे विभाजन करून पंढरपूर येथे सर्कल ऑफिस उभारण्यात यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news