

पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सद्गुरू सीताराम महाराज मंदिर परिसरात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे.
महिबूब इब्राहिम आतार (रा.खर्डी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यास सोलापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. महिबूब आतार हे नेहमीप्रमाणे खर्डी येथील मंदिर परिसरातील ओट्यावर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अद्यात व्यक्तीने पाट्यासारखा दगड त्यांच्या डोकीत मारला. या प्रकारामुळे आतार हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.
काही वेळाने हा प्रकार समजताच स्थानिक भाविक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात हलविले होते. अधिक तपास पंढरपूर तालुका पोलिस करीत आहेत.