

पंढरपूर : कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे. यासाठी तब्बल 38 वर्षे सुरू असलेल्या लढ्यात पंढरपूर तालुक्यातील सर्व वकिलांचा सहभाग होता. आंदोलनातून वकिलांनी खंडपीठाच्या मागणीची धग कायम ठेवली होती. शुक्रवारी सर्किट बेंचबाबत अधिसूचना जाहीर होताच पंढरपुरात सर्व वकिलांनी नामदेव पायरी येथे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयात ये जा करणे वकील, पक्षकार यांच्यासाठी वेळ खाऊ आणि खर्चिक होते. यामुळे वकील, पक्षकार, पोलिस यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हे टाळण्यासाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे,अशी मागणी होत होती.
याकरिता आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. पंढरपूर वकील संघटनेकडून पंढरपूर ते कोल्हापूर रथ यात्रा काढण्यात आली होती. याला यश आले आहे. त्यामुळे जलदगती न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना वकिलांनी व्यक्त केल्या. पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विकास भोसले, उपाध्यक्ष अॅड. संजय व्यवहारे, सचिव अॅड. शरद पवार, अॅड. गणेश चव्हाण, सदस्य अॅड. एस. एच. गायकवाड, अॅड. वर्षा हीरणवाले, अॅड. वसंत भादुले, अॅड. अर्जुन चव्हाण, अॅड. राजेश चौगुले, अॅड. किरण घाडगे, अॅड. धनंजय पवार, अॅड. दत्तात्रय पाटील, अॅड. दादासाहेब देशमुख, अॅड. संजय रोंगे, अॅड. धनश्री घाडगे, अॅड. विनायक सरवळे, अॅड. संतोष नाईकनवरे, आदी उपस्थित होते.