MSRTC News : कार्तिकीसाठी एसटी प्रशासनाने केले ८० बसेसचे नियोजन

चंद्रभागा बसस्थानकावरून एसटी सेवा, शासकीय योजना सवलतींचेही मिळणार लाभ
ST
STPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी वारकरी भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून परिवहन (एसटी) महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाकडून नियोजन सुरू केले जात आहे. वारीचे मुख्य दिवस असलेल्या शनिवार व रविवार या एकादशी व द्वादशी व मंगळवारी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य काळ असून, या दरम्यान जिल्ह्यातील विविध आगारांतून ८० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच ४० प्रवाशांनी एकत्रित मागणी केली. तर अशांसाठी स्वतंत्र बस सोडली जाईल.

गतवर्षीप्रमाणेच याहीवर्षी यात्रेदरम्यानची वाहतूक ही चंद्रभागा बसस्थानकावरून केली जाणार आहे. याठिकाणी प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, बैठक व्यवस्था, आरक्षण व चौकशी कक्ष आणि महिलांना बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षची सुविधा करण्यात आली आहे. यात्रेच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी ३३ अधिकारी व पर्यवेक्षक नियोजनासाठी नियुक्त केले आहेत. प्रवाशांना सर्व सवलती लागू राहणार असल्याने, भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसमधूनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी सुविधा व सवलती

​l वाहतूक केंद्र : चंद्रभागा बसस्थानक (पिण्याचे पाणी, शौचालय, हिरकणी कक्ष, चौकशी व आरक्षण केंद्र उपलब्ध).

​l समूह बुकिंग सुविधा : किमान ४० प्रवासी असल्यास नजीकच्या आगारातून तत्काळ जादा बस.

​l तांत्रिक मदत : चंद्रभागा स्थानक, वाखरी, शेटफळ, मोहोळ, टाकळी व करकंब येथे 'ब्रेक डाऊन' पथके कार्यरत.

​l सवलती : महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवासी सवलत लागू.

कार्तिकी वारीसाठी परिवहन विभागाच्या विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यातील ९ आगारतूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अन्य ठिकाणावरूनही अतिरिक्त बसेसही वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील.
- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ

आगारनिहाय बसेसचे नियोजन

बार्शी : १८

​पंढरपूर : १२

​कुर्डूवाडी : १०

करमाळा : ०८

​मंगळवेढा : ०८

​सोलापूर : ०७

अक्कलकोट : ०६

सांगोला : ०६

अकलूज : ०५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.