

पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी गावातील खर्डी ते शिरभावी जाणारे रोडवर अशोक लेलँएक टेम्पो त्यामध्ये एक ब्रास वाळू मिळून आली. सदरची वाळू अवैधरीत्या अशोक लेलँडमध्ये वाहतूक करताना मिळून आलेली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी सदरचे अशोक लेलँड विदाऊट नंबरचे व वाळू असा एकूण 6 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलेला आहे.
तसेच सरकोली या ठिकाणी टेम्पो ताब्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक ब्रास वाळू एकूण किंमत 6 लाख 6 हजार असे एकूण दोन अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व दोन ब्रास वाळू असा 13 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस आणि जप्त करून सदर गाडीचा चालक आणि मालक याचे विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
ही कारवाई पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनची वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहपोनी शहाजी गोसावी, विभावरी रेळेकर, विक्रम वढणे, बनसोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे, मंगेश रोकडे, सुहास देशमुख, दीपक भोसले, तात्या गायकवाड, सतीश चंदनशिवे यांच्या पथकाने केली आहे.