Bhima river sand theft: भीमा नदी वाळू तस्करांनी पोखरली

गुरसाळे बंधारा येथे 25 ब्रास अवैध वाळूच्या साठ्यासह जेसीबी, टिपर, ट्रॅक्टर जप्त
Bhima river sand theft: भीमा नदी वाळू तस्करांनी पोखरली
Published on
Updated on

पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातून वाहणारी भीमा नदी ही जशी पंढरपूर येथे चंद्रभागेचे रुप घेऊन भाविकांना सुख समाधान देते. याच नदीपात्रात मात्र अवैध वाळू तस्कर वाळू चोरी करुन नदीचे विद्रुपीकरण करत आहेत. वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे भाविक यात बुडून मृत्यूदेखील पावले आहेत. बुधवारी सकाळी गुरसाळे पुलाजवळ वाळू चोरी करण्यात आली. येथे पोलिस पथकाने वाळू साठ्यावर छापा टाकला असता 25 ब्रास वाळू मिळून आली आहे.

पंढरपूर येथील भीमा नदीपात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा व वाहतूक काही केल्या बंद होण्याचे नाव घेत नाही. हा वाळू उपसा बंद करण्यासाठी महसूल प्रशासनाने भरारी पथके नेमली आहेत. मात्र, पथक पुढे गेले की, वाळू तस्कर वाळू उपसा सुरू करतात. त्यामुळे महसूल विभागाचे भरारी पथक हे असून अडचण तर नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आज गावोगावी मोठमोठ्या टिपरने वाळू पुरवठा केला जात असल्याचे चित्र दिसून येते.

याकडे महसूल प्रशासन, पोलिस विभाग व पोलिस पाटील यांचे डोळे बंद व कानावर हात असतात, अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. त्यामुळेच वाळू तस्कर वाळू चोरीचे धाडस मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news