Pandharpur Fertilizer Shop Fire| पंढरपुरात खताच्या दुकानाला आग

केमिकल खत पेटल्यामुळे उग्र वास, नागरिकांना स्वसनाचा त्रास
Pandharpur Fertilizer Shop Fire| पंढरपुरात खताच्या दुकानाला आग
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या शेजारी असलेल्या खताच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांची खते जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पंढरपूर नगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग लागून एक तास झाला. तरी आग आटोक्यात आली नाही.

खताच्या उग्र वासाने परिसरातील नागरिक हैराण झाले असून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. आगीची घटना घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल तत्काळ घटना स्थळी दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी घटना स्थळी भेट दिली असून घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news