Pandharpur flood : पंढरपूरला पुन्हा पुराचा धोका

उजनी, वीर धरणे शंभर टक्के भरली
Pandharpur flood
फाईल फोटो File Photo
Published on
Updated on

पंढरपूर : उजनी आणि वीर ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरल्याने दोन्ही धरणांतून अनुक्रमे भीमा आणि निरा नदीत मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे. हे दोन्ही विसर्ग संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पूर येणार आहे. चंद्रभागा तीरावरील विविध मंदिरे, समाधी यांना पुन्हा पुराचा वेढा पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

उजनी न भीमा नदीपात्रात सोमवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता एक लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. वीर धरणातूनही 17 हजार क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सुरू आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news