Pandharpur Crime : अत्याचारग्रस्त तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

अत्याचाराच्या घटनेनंतर तरूणीने ॲसिड पिऊन जीवन संपविण्याचा केला होता प्रयत्न
Rape Case
अत्याचारग्रस्त तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू(File Photo)
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील एका तरुणीवर दीड महिन्यापूर्वी अत्याचार करण्यात आला होता. यामुळे या तरुणीने 11 एप्रिल रोजी ॲसिड पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अखेर तिचा मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी या प्रकरणातील आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी करकंब पोलिस ठाण्यासमोर तरुणीचा मृतदेह ठेवून आंदोलन केले.

तरुणीवर विविध ठिकाणी नेऊन एका तरुणाने अत्याचार केला. यामुळे तरुणी घाबरून गेली होती. याप्रकरणी करकंब पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने यानंतर ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी वेळीच तिला उपचारासाठी पुणे, नंतर सोलापूरला उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news