Pandharpur corridor protest: पंढरपूरमध्ये कॉरिडॉर विरोधात मोटारसायकल रॅली

शासकीय पडीक जागांचा शोध; विकास आराखडा या जागांवर राबवण्याची मागणी
Pandharpur corridor protest
Pandharpur corridor protestPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : प्राचीन पंढरीचा विध्वंस नको, कॉरिडॉर सरकारी जागांवर करा, अशी मागणी करत कॉरिडॉर बाधितांनी सरकारी पडीक जमिनींची पाहणी करत शोध घेतला. याकरिता भव्य मोटार सायकल रॅली काढली. या पडीक जमिनींचा अहवाल प्रांत कार्यालयास सादर केला.

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने बुधवारी कॉरिडॉर विरोधात मोटरसायकल रॅली काढली. पंढरपुरातील अनेक सरकारी, निमसरकारी पडीक जागांचा शोध घेण्याकरीता ही मोटर सायकल रॅली काढली. या रॅलीद्वारे शहरातील पडीक जागांना प्रत्यक्ष भेट दिली. यामध्ये खादी ग्रामोद्योग, लोटेवाडी म्हसोबा, फटाका स्टॉल, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जूने कोर्ट, हनुमान मैदान, पालिका दवाखाना, जुनी नगरपरिषद इमारत, आदी जागांची पाहणी केली. या जागांचा अहवाल प्रांत ऑफिसला सादर केला आहे. विनावापर शासकीय जागांचा सुयोग्य वापर करून सुंदर विकास आराखडा वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती यांच्या वतीने शासनाला सादर केला होता. त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या मोटार सायकल रॅलीत सुमारे 500 पेक्षा अधिक बाइक व हजारो लोक सहभागी झाले होते. यामध्ये ह. भ. प. माउली महाराज गुरव, ह. भ. प. वडगावकर महाराज, बाबाराव महाजन बडवे, वैभव बडवे, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल गवळी, गणेश लंके, विवेक बेणारे, जव्हेरी, येवनकर, उंडाळे, तसेच महिला आघाडीच्या बडवे, डॉ. बेणारे, वट्टमवार, लंके, आगरवाल यांच्यासह पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीतील पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news