Pandharpur News: कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

आषाढी एकादशीनंतर वाळवंट, दर्शन रांग, मठासमोर जास्त कचरा; पंढरपूर शहर दोन दिवसांत होणार स्वच्छ
Pandharpur News: कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरीत आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दि. २५ जुलै रोजी संपन्‍न झाला, एकादशी साजरी करून बहुतांश भाविक परत माघारी फिरले आहेत. त्यामुळे गर्दी कमी होऊ लागली आहे. यात्रा कालावधीत साचलेला कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांत शहर स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने शहर लवकर स्वच्छ करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यात्रानंतर बहुतेक द्वादशी दिवशी शहरातील कचरा उचलण्याचे काम हाती घेण्यात येते.परंतु, यावर्षी वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जाण्यास अडचण नाही. मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्याचे काम लगेच हाती घेण्यात आले आहे.

एकादशीच्या रात्रीपासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम चालू केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील सर्व कचरा उचलण्याचा प्रयत्न करण्यात येत कचरा उचलण्याकामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनवारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत.

मात्र, बऱ्याच ठिकाणी भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने दुर्गंधी पसरू नये म्हणून कचरा उचलण्याचे काम करत आहेत. नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, आरोग्य निरीक्षक नानासाहेब गोरे शहर स्वच्छ व सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news