Pandharpur Breaking | म्हसवड - पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कूटूंबातील 8 जणांचा मृत्‍यू! पिकअप गाडी विहीरीत कोसळली

५ जणांना वाचवण्या यश, तांदूळवाडी गावाजवळ मोठा अपघात, रस्त्‍यालगतच विहीरी, पाण्याने भरलेल्या विहीरीत सर्वांचा बूडून मृत्‍यू
अपघाता घडण्याच्या अगोदर घेतलेले या कुटूंबाचे छायाचित्र
अपघाता घडण्याच्या अगोदर घेतलेले या कुटूंबाचे छायाचित्र
Published on
Updated on

मळोली तांदुळवाडी ता. माळशिरस येथे पुणे पंढरपूर रोड लगत असणाऱ्या विहरीत पिकअप गाडी कोसळून झालेल्या अपघातामध्ये एकाच गावातील व एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. अपघाताचे वृत्त समजताच तांदुळवाडी गावातील व परिसरातील लोकांनी मदतीसाठी प्रयत्न चालू केले. हे सर्व रहिवासी सर्व ग्रुप पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे. असल्याचे समजते. हे सर्वजण भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. म्हसवड पंढरपूर मार्गावर हा अपघात झाला. या अपघातातून ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच पाठीमागील दोन वर्षापूर्वी तयार झालेल्या पंढरपूर सातारा रोड वरून वाहणाऱ्या वाहनांचा वेग वाढल्याने अनेक वेळा अपघात वाढल्याचे आपण पाहत असतानाच आज झालेल्या या प्रकाराने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पिकअप मधील सर्व मयत हे अपघाताच्या अगोदर नुकतेच म्हसवड येथील सिद्धनाथ येथील मंदिरात देवदर्शन करून निघाले होते.

यामध्ये तीन पुरुष चार महिला व पाच लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, पिकअप मधील प्रवाशी यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नही करता आले नाहीत. विहीर पूर्णपणे पाण्याने गच्च भरली असल्याने या सर्वांचा पाण्यात बुडून अंत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येते आहे. रोडच्या बाजूस असणाऱ्या या विहरीस कोणतेही दिशादर्शक फलक अथवा कंपाऊंड दिसून येत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान पणा पूर्णपने उघडा पडला आहे.

याठिकाणी हजर असलेल्या इरफान मुजावर, स्वप्नील कदम, किरण दुधाट, तुकाराम कर्णवर, धायगुडे, दादा माने, हेगडे ड्रायव्हर, हणमंत रणदिवे, सौरभ कोळी हनुमंत रंधवे धनाजी कदम यांनी उरलेल्यांचे प्राण वाचवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news