Pandharpur Crime : पंढरपूरमधील १० वाळू तस्कर वर्षभरासाठी हद्दपार

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही कारवाई केली
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : अवैध वाळू व्यवसायात सक्रिय असलेल्या पंढरपूर तालुक्यातील शेळे येथील १० वाळू तस्करांना सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख सुनील विलास पाटील याचा समावेश आहे.

हद्दपार केलेल्यांमध्ये सुनील पाटील, बाबासाहेब गाजरे, संभाजी लोखंडे, राहुल नागणे, सोमनाथ गाजरे, बंडोपंत गाजरे, बालाजी गाजरे, बाळू ऊर्फ आप्पा गाजरे, समाधान लोकरे आणि सचिन हैबत लोकरे सर्व (रा. शेळवे ता. पंढरपूर) यांचा समावेश आहे.

पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या या टोळीतील सदस्यांविरुद्ध दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रेखा घनवट यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता.

पंढरपूर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी प्रस्तावासंदर्भातील कार्यवाही करून सविस्तर अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर केला. त्यानंतर संबंधित दहा जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. यापुढेही वाळू तस्करीतील गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news