Panchayat Raj campaign: पंचायतराज अभियानाच्या तयारीला मिळणार वेळ

31 मार्चपर्यंत मुदतवाढ : जि.प.कडून तयारी
Panchayat Raj campaign
Panchayat Raj campaignFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता अभियानाला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना कामे करण्यास आणखी वेळ मिळणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. त्याचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर होती. मात्र, राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने अभियानाकडे दुर्लक्ष करत अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मदत केली होती. त्यामुळे अभियानाची कामे मागे पडली होती. त्यामुळे शासनाने अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचा फायदा ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, जिल्हा परिषदेला होणार आहे.

दरम्यान, तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविली जात आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्यात सुशासन, असामाजिक न्याय यावर लक्ष केंद्रित केले जाते.

अतिवृष्टीमुळे मिळाली मुदतवाढ

अभियानाच्या सुरुवातीच्या कालावधीत राज्यात उद्भवलेली पूर परिस्थिती तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास शासनाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अभियान यशस्वी राबवून क्रमांक पटकाविण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. या मुदतवाढीचा फायदा घेऊन अभियान यशस्वी राबविणार आहे.
- सुर्यकांत भुजबळ, डेप्युटी सीईओ, ग्रामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news