Solapur Accident: टेम्पोची दुचाकीला धडक; वटवटेतील दोघांचा मृत्यू

सोलापूर-मंगळवेढा मार्गावर कामती येथील उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

कामती : सोलापूर-मंगळवेढा मार्गावर कामती येथील उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवेढ्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

बालाजी यल्लाप्पा खरात (वय 42) व सुरेश अण्णा होनमाने (47, दोघेही रा. वटवटे, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. दोघेजण आपल्या दुचाकीवरून कामतीकडे जात असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच 13 डी क्यू 6316) ने कामती येथील उड्डाणपुलाजवळ दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news