

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या योजनेतून प्रवास करत असलेल्या सर्वच नागरिक व लाडक्या बहिणी या सर्वांनाच एनसीएमसी हे स्मार्ट कार्ड महामंडळाने अनिवार्य केले आहे. हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लाडक्या बहिणींसह सर्वच सवलती योजनेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे स्मार्ट काढण्यासाठी फक्त २८ दिवस राहिलेले आहेत. त्यानंतर एक ऑगस्टपासून हे कार्ड नसलेल्यांना कोणालाही सवलतीतून प्रवास करता येणार नाही. सवलत योजनेतील प्रवाशांना येत्या २८ दिवसातच स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे.
एस.टी. बसचा प्रवास स्मार्ट व डिजिटल होत असून सवलत योजनेतील प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सक्तीचे केली आहे. ही डिजिटल क्रांती असून प्रवाशांना प्रवासात तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. प्रवासाचा अनुभव सुखकरही होईल.
३० दिवसांत मिळणाऱ्या कार्ड नोंदणी प्रक्रिया सोपी महामंडळाने सोपी केली असून वितरण प्रक्रिया सुद्धा सुलभ केली आहे. कार्डसाठी अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत लाभार्थ्यांला स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन रिचार्जच्या माध्यमातून विद्यार्थी हे कार्ड सहज वापरू शकतील. यामुळे रोख रकमेचा व्यवहार टळून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.
शहर-जिल्ह्यात जवळपास दोन लाख ८९ हजार ३७१ प्रवाशांना प्रवाशांना कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. या डिजिटल कार्डमुळे प्रवास सुलभ होणार असून सर्वच वयोगटातील सवलत योजनेतील प्रवासी ते वृद्धांपर्यंत सर्वच घटकांना याचा मोठा फायदा होईल. परिवहन महामंडळ, ट्रॅव्हिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड व नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात आहे. कॅशलेस व स्मार्ट प्रवासाच्या दिशेने महामंडळाची वाटचाल सुरू आहे.