

वैराग : वैराग - धामणगाव रस्त्यावरील ओढ्याजवळ ट्रॅक्टरच्या हेडला मागे जोडलेल्या दोन उसाने भरलेल्या गाड्या अंगावरून गेल्याने एका 45 वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नितीन भीमराव गायकवाड (वय 45, रा. सर्जापूर) असे मृताचे नाव आहे. शनिवारी दुपारी वैरागकडून गायकवाड हे पत्नीसह आपल्या शेतातून सर्जापूर कडे निघाले होते. त्यावेळी अंगावर ट्रॅक्टर गेल्याने नितीन गायकवाड यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.