Prescription mandatory for medicines: चिठ्ठीशिवाय औषध द्याल तर गुन्ह्यास पात्र व्हाल

सहा हजार मेडिकल मालकांना सूचना
Prescription mandatory for medicines
Prescription mandatory for medicinesPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा हजारांहून अधिक मेडिकल दुकानांची संख्या आहे. यातील सर्वच मेडिकल दुकान मालक व चालकांना जिल्हा औषध प्रशासनाने पत्र पाठवले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची नावांच्या चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) शिवाय रुग्ण किवा रुग्णांच्या नातेवाईकांना औषध दिल्यास संबंधित मेडिकलच्या मालकासह चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा औषध प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकानांसह जनरल स्टोअर्स तसेच पानटपरीतही डोकेदुखी, सर्दी, खोकला व पोटदुखीवरील गोळ्यांसह काही औषधे विकली जातात. ही औषधे दर्जेदार तर नसतात. ती निकृष्टही असू शकतात. म्हणून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोकाही पोहोचू शकतो. या धर्तीवर जिल्हा औषध प्रशासनाकडून परवाना धारक मेडिकलचे मालक व चालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा हजारांहून अधिक औषधांची दुकाने कार्यरत आहेत. यावरील देखरेखीसाठी एकही पूर्णवेळ औषध निरीक्षक येथे कार्यरत नाही. जिल्ह्यात दहा औषध निर्माणच्या कंपन्या व 22 रक्तपेढ्या आहेत. याविषयी एखाद्यी तक्रार दाखल झाल्यास या चौकशीसाठी औषध निरीक्षकाला पुण्याहून बोलावून घ्यावे लागते.

दंड अथवा कारावास

नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमांनुसार डॉक्टरांनी औषधांचे जेनेरिकनाव स्पष्ट व तर्कसंगत लिहिणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित डॉक्टरांचा परवाना रद्द केला जाण्याची तरतूद या कायद्यात आहे. केमिस्टने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास औषध प्रशासन (एफडीए) कारवाई करू शकते. अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास ग्राहक संरक्षण कायदा किंवा व अन्य कायद्यांनुसार दंड अथवा कारावास होऊ शकते. तशी या कायद्यात तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news