Child drowns : ड्रेनेजजवळ साचलेल्या पाण्यात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नई जिंदगी परिसरातील देसाई नगर येथील घटना
Drowning Incident |
Child drowns : ड्रेनेजजवळ साचलेल्या पाण्यात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यूPudhari File Fhoto
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील नई जिंदगी परिसरातील देसाई नगर येथे ड्रेनेजच्या मेनहोल जवळ साचलेल्या पाण्यात बुडून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.7) दुपारी ही घटना घडली.

अहिल उस्मान शेख (वय 9, रा. देसाईनगर, नई जिंदगी) असे मृत मुलाचे नाव आहे. अहिल हा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. नई जिंदगी येथील थोबडे प्लॉटिंग जवळील ड्रेनेजच्या मेनहोल जवळ साचलेल्या पाण्यात अहिल बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. एमआयडीसी पोलिस घटनास्थळी हजर झाले. अहिल यास हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news