Solapur Car Accident | नातेपुतेजवळ जुन्या पालखी मार्गावर भीषण अपघात; कार थेट कालव्यात, तिघांचा मृत्यू

मुंबईहून फोंडशिरसकडे कार जात असताना दुर्घटना
Nira Canal car falls
निरा उजवा कालव्याच्या पुलाजवळ भीषण अपघात घडलाPudhari
Published on
Updated on

Nira Canal car falls

नातेपुते : नातेपुते (ता. माळशिरस) येथील परिसरातील जुन्या पालखी महामार्गावर निरा उजवा कालव्याच्या पुलाजवळ भीषण अपघात घडला. मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी कार पुलावरून थेट वाहत्या पाण्यात कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर चालक बचावला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये प्रीती सुनील टिळेकर, त्यांचे वडील हनुमंत जठार आणि आई मंजू हनुमंत जठार (सर्व रा. दूधबावी, ता. फलटण) यांचा समावेश आहे. कारचे चालक सुनील मोहन टिळेकर हे अपघातातून बचावले आहेत.

Nira Canal car falls
Solapur Accident: ट्रकला ओव्हरटेक करताना दोघांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान दोघांचे मृतदेह सापडले असून प्रीती टिळेकर यांचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. कालव्यात शोधमोहीम सुरू असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news