

सोलापूर : देशात भाजपाप्रणीत प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना मिळत आहे. समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष्य करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे करण्याची मालिका सुरू झाली आहे. संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात आहे.
या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला महाविकास आघाडीच्या वतीने विरोध करत बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला. रस्त्यांवर येत विधेयकाची होळी केली. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे हा मोर्चा जाहीर सभेत रूपातर झाला.
जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा, मोदी-शहा मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद सरकारच्या विरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला. या मोर्चात माकपा, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात आडम मास्तर, सुधीर खरटमल, बळीराम साठे, चेतन नरोटे, आरीफ शेख, सुुशिल बंदपट्टे, प्रा. अशोक निंबर्गी, अजय दासरी, भारत जाधव, अॅड. एम.एच. शेख. अॅड.अनिल वासम, प्रताप चव्हाण आदीजण यात सहभागी झाले होते.