Municipal Council Election Result 2025: मंगळवेढ्यात आघाडीकडून आवताडे नगराध्यक्ष

आमदारांचे प्रयत्न कमी पडले; सिद्धेश्वर आवताडे यांचे नेतृत्व झळकले
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: मंगळवेढ्यात आघाडीकडून आवताडे नगराध्यक्षPudhari Photo
Published on
Updated on

मंगळवेढा : नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे या 212 मतांनी विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप पराभूत झाल्या. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आ. समाधान आवताडे यांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी फार कष्ट घेतले. मात्र, त्यात निसटता पराभव झाला.

सकाळी तहसील निवडणूक अधिकारी मदन जाधव यांच्या अधिकाराखाली मतमोजणी सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. चार फेरीमध्ये या निकाल जाहीर करण्यात आला. भाजपचे सोमनाथ आवताडे हे यापूर्वीच बिनविरोध झाले तर मतमोजणीत भाजपला व तिर्थक्षेत्र आघाडीला प्रत्येकी 9 जागा तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या.

नगरपालिकेत सत्ता महायुतीची आणि नगराध्यक्ष तिर्थक्षेत्र आघाडीचा असे बलाबल झाले. प्रभाग एक मध्ये शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले प्रा. येताळा भगत व प्रतीक्षा मेटकरी ह्या विजयी झाल्या. प्रभाग दोन मध्ये अजित जगताप यांच्या बालेकिल्यात तिर्थक्षेत्र आघाडीचे नागर गोवे व प्रमोद सावंजी विजयी झाले तर लक्ष्मी ठरलेल्या प्रभाग तीन मध्ये विद्यागौरी अवघडे या विजयी झाल्या. प्रभाग चारमधून उपनगरात चंद्रकांत घुले पुन्हा तर असून सोबत विजया गुंगे विजयी झाल्या. प्रभाग पाच मध्ये तिर्थक्षेत्र आघाडीच्या प्रीती सूर्यवंशी व भाजपचे माजी नगरसेवक अनिल बोदाडे आघाडीतून विजयी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news