Municipal Council Election Result 2025: विकासकामांवर भाजपची सत्ता

अक्कलकोटसह मैंदर्गी नगरपालिकाही आली ताब्यात
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: विकासकामांवर भाजपची सत्ताPudhari Photo
Published on
Updated on

अक्कलकोट : आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्य शासनाकडून भरघोस निधी आणून केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेने भाजपला कौल दिला. अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सालाकरिता झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अक्कलकोट नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह 22 उमेदवार विजय होऊन झेंडा फडकविला आहे.

भारतीय जनता पार्टीकडे तब्बल 100 हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ 60 जण तर शिवसेना शिंदे गटाकडे 80 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रारंभी नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिलन कल्याणशेट्टी व महेश हिंडोळे ही दोन नावे आघाडीवर होती. काँग्रेस, शिवसेना शिवसेना शिंदे गट व इतरांना घेऊन आघाडी करण्याचे नियोजन होते मात्र नगराध्यक्ष पदाचे घोडे अडल्याने ही आघाडी बिघडली. भाजपाकडून मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेस पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटाकडून रईस तीनवाला अशी तिरंगी लढत होऊन भाजपाचे माजी नगरसेवक अखेर नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

अक्कलकोट नगर परिषदेवर गत वेळेस भारतीय जनता पार्टीची 17 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासह एक हाती सत्ता होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी सन 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा 38 हजार हून अधिक मताधिक्याने पराभव करून इतिहास घडविला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्या काळात देखील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्याच्या विकासाकरिता विविध माध्यमातून निधीचा प्रवाह सुरु ठेवून विविध प्रश्न मार्गी लावत अनेक कामे केली.

तदनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद विराजमान झाल्याने याचा पुरेपूर फायदा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास साधला.

काँग्रेस या पक्षाकडे ठोस कामाचा विकासनामा नसल्याने प्रचारात व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्याने केवळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या एकमेव जाहीर सभेने शअरवासियांची मने जिंकता आली नाही. राज्यात शिवसेना व भाजपाची माहिती सरकार असले तरी अक्कलकोट येथे भाजपाने स्वतंत्र लढविण्याचे ठरविले. शिवसेना शिंदे गटाने देखील 23 ठिकाणी उमेदवार उभे केले, शिवसेना शिंदे गटाने आणखीन प्रचारात व निवडणुकीत जोर लावला असता तर किमान पाच ते सात नगरसेवक निवडून आले असते अशी चर्चा सर्वसामान्यतून होत आहे.

स्व. मोहम्मदशफी टीनवाला यांनी दोन वेळा नगराध्यक्ष पद भूषविले होते त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक रिंगणात होते मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला. माजी नगराध्यक्ष स्व. पंचाप्पा कापसे यांच्यानंतर तब्बल चार दशकानंतर त्यांचे सुपुत्र रमेश कापसे नगरसेवक म्हणून विजयी झाले.

रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे हे भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आले. गतवेळी नगरपालिकेतील नगरसेवक असलेले महेश हिंडोळे, महेश इंगळे, यशवंत धोंगडे, सोनाली शिंदे, स्वीकृत नगरसेवक कांतु धनशेट्टी, सद्दामहुसेन शेरीकर, भागुबाई कुंभार या पुन्हा नगरपालिकेत काम करताना दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news