

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दि. 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता 9 नोव्हेंबर रोजी आहे. विद्यार्थी संघटना आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील दीड हजारहून अधिक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विविध विभागांतील 9 संवर्गांमध्ये एकूण 385 पदांची भरती असून, राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. सोलापूर जिल्ह्यातून दीड हजारहून अधिक उमेदवार एमपीएससी परीक्षा देणार आहेत. पावसामुळे परीक्षा पुढे ढकलली गेल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द होण्याची भीती दूर झाली असून, उमेदवारांना आता अभ्यासासाठी अधिक वेळ मिळाला आहे.