

सोलापूर : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आणि एसपीएससीच्या परीक्षा 21 डिसेंबरला एकाच दिवशी आहेत. त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात असून, परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी परीक्षार्थ्यांकडून होत आहे.
राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी (दि. 2) पार पडले. त्याचा निकाल बुधवारी (दि. 3) होणार होते. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व नगरपालिका, नगरपंचायतीची मतमोजणी 21 डिसेंबरला घ्यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र, त्याच दिवशी एमपीएससीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकाच दिवशी मतमोजणी आणि एमपीएसी परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. एमपीएससी परीक्षेच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत.