

मंगळवेढा : केंद्रातील सरकार हे मतचोरीतून आले. त्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 300 खासदारांनी आंदोलन केले. तेच आंदोलन सत्तेच्या बळावरून दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, असे मत खा.प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
श्रावण मास व गोपाळकालानिमित्त रामलिंग मंदिरामध्ये खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खा. शिंदे म्हणाल्या की, मंगळवेढेकरांनी लोकसभेला भरभरून मतदान केले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे मंगळवेढेकरांच्या नेहमी सोबत राहण्याचा शब्द दिला. जिजाऊ, सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने काम केले आहे. त्याच पद्धतीने महिलांमध्ये जिजाऊ-सावित्री जाग्या झाल्या पाहिजे, सध्या मत चोरणार्यांपासून महिलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देत म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी ताकद मिळावी. तर तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की, देशाचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीबद्दल जो आवाज उठवला, त्याला लोकसभेच्या खा. प्रणिती शिंदे यांनी जोरदार समर्थन केले आहे. आम्हाला ताईंचा सार्थ अभिमान आहे. लोकांच्या व्यथा, समस्या लोकसभेत ठामपणे मांडणारा खासदार मिळाला. यावेळी प्रदेश सचिव अॅड. रविकिरण कोळेकर, अध्यक्ष मारुती वाकडे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले, मुरलीधर घुले, युवराज घुले, राहुल वाकडे, संदीप फडतरे, पांडुरंग माळी, मुबारक शेख, गणेश धोत्रे, मनोज माळी, नाथा ऐवळे, आयेशा शेख, सुनिता अवघडे, नागनाथ राजमाने, गजानन देशमुख, विनोद शिंदे, पंडित पाटील, ज्ञानेश्वर सोरडीकर, सिद्धार्थ लोकरे, राजन ठेंगील, शहाजी कांबळे, तसलीम आकुंजी, समीर इनामदार उपस्थित होते.