

सोलापूर : तीन मुलांची आई व 36 वर्षांच्या असलेल्या श्रध्दा यलगम यांनी 13 वर्षांनी वर्षांच्या गॅपनंतर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत धडक मारली आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यलगम यांनी राज्य जलतरण स्पर्धेत सुवर्ण, रौप्य पदक जिंकत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे. छंद जोपायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी तितकीच महत्त्वाची असते. मात्र एखाद्या महिलेला एखादी साधी स्पर्धा खेळायची असेल तर तिला तिच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार निर्णय घ्यावा लागतो. मात्र ती महिला जर विवाहित असेल तर तिच्या समोरचे आव्हान देखील तितकेच मोठी असतात. यलगम यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यलगम यांना लहानपणी वडिलांच्या प्रेरणेने जलतरण शिकण्याची आवड निर्माण झालेी. त्यांनी शालेय जीवनात मुंबई येथील संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यानची 5 किलोमीटरपर्यंत असलेल्या सागरी जलतरण स्पर्धा वेळेत पूर्ण केल्या. दहावीत असताना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भागीरथी नदी स्पर्धेत 19 कि.मी. लांबीचा पल्ला 2 तास 50 मिनीटात पूर्ण केला असून अश्याप्रकारे झालेल्या स्पर्धेत सोलापुरातील आतापर्यंत कोणीही जिंकले नाही.
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण व धावणाच्या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या ठरल्या. तब्बल 13 वर्षांच्या गॅपनंतर, तीन मुलांची आई असलेल्या यलगम यांनी केवळ दोन दिवसाच्या सरावानंतर डिसेंबरमध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 1 सुवर्णपदक व 2 रौप्य पदक पटकावले.