Bribery Case: मोरोची गावच्या ग्रामसेविका पूजा लोंढे अँटी करप्शन च्या जाळ्यात

26 हजार 500 रूपयांची लाच घेताना झाली अटक
Bribery Case
Bribery CasePudhari
Published on
Updated on

नातेपुते : माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका पूजा बाळू लोंढे ( वय 38 ) यांना अँटी करप्शन ने लाच घेताना बुधवारी अटक केली.

तक्रारदाराने केलेल्या कामाची बिले तसेच चालू कामाची बिले काढण्यासाठी लोंढे यांनी 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडी करून 46 हजार 500 रुपयाची मागणी केली. त्यामधील पहिला हप्ता 26 हजार 500 घेताना महिला ग्रामसेविकेस अँटी करप्शन सोलापूरच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.त्यांना अटक केली आहे.

गुन्हा नोंद नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू होती. यावेळी एसीबी पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, यांचे मार्गदर्शनाखाली शैलेश चंद्रकांत पवार, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, प्रियांका गायकवाड, चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news